दोघे जण गंभीर जखमी;
लखमापूर बोरी :-
गडचिरोली हुन चामोर्शी ला परत येत असताना रानडुकराने भिषण धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 07 ऑगस्ट बुधवार ला सेमाना जवळच असलेल्या वाकडी फाट्याच्या समोर घडली.
चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत अड्याळ येथील ग्रामरोजगार सेवक प्रदीप उंमरे (38) व *ग्रा.पं. लखमापूर बोरी येथील ग्रामरोजगार सेवक साईनाथ कुळमेथे (39)* हे बुधवार , 07 ऑगस्ट रोजी एकाच दुचाकीने दोघेजण 10 वा. मनरेगा च्या कार्यालयीन कामाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली इथे गेले होते, काम आटोपल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील स्वगावी परत येण्यासाठी निघाले होते. वाटेत वाकडी फाट्यासमोर सव्वातीन वाजताच्या दरम्यान अचानक डाव्या बाजूने वेगात धावत आलेल्या डुकराने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप उंमरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर मागे बसून असलेल्या साईनाथ कुळमेथे यांना शरीराच्या संपूर्ण डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून, अपघातानंतर मागुण येत असलेल्या एका अज्ञात दयावान पीकअप चालक व त्याच्या सहकाऱ्याने दोघांना पण आपल्या पीकअप मध्ये बसवून तातडीने गडचिरोली येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून दिल्यानंतर त्यावर तिथे उपचार सुरू आहे.
सदर घटनेची तक्रार केली असता वनविभाग गडचिरोली येथील कर्मचारी रुग्णालयात येऊन रुग्णाची विचारपूस करून सदर घटनेची चौकशी करीत असुन रुग्णाच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जातं आहे
(वार्ताहर)
Post a Comment