मार्कंडा कंन्सोबा येथील गावकऱ्यांच्या वतीने पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचा व विविध विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार
परिस्थिततीला न जुमानता आपले यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे - ॲड. विश्वजीत कोवासे
आष्टी: परिस्थितीला न जुमानता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रयत्नशील राहिल्यास यश संपादन करता येते असे प्रतिपादन ॲड.विश्वजीत कोवासे यांनी मार्कंडा (कं) येथील सत्कार समारंभा प्रंसंगी व्यक्त केले
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंनसोबा येथी तीन तरुण व एक तरुणी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी त्यांचा व विषेश कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला
अजय बेलकिवार,प्रफुल्ल बेलकीवार, दिपक कांबळे, वर्षा सातर, या तरुणाची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली. यांचे वडील मोलमजुरी करुन घरचा गाडा हाकलत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व विध्यार्थी घरच्या परिस्थितीला न डगमगता शिक्षण घेत असतानाच पोलिस दलात निवडीसाठी गावातील वाचनालयात सराव करत होते.
गावातील विध्यार्थी पवन मस्के यांनी वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विध्यार्थी कसे घडले पाहिजे या हेतूने लोकवर्गणीतून वाचनालय सुरू केले व ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही सुविधा मिळवून घेतली व हे वाचनालय सुरळीत सुरू राहील आणि गावातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या काही वाचनालयाच्या अडचणी लक्षात आणून दिले असता सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी पंचवीस हजार रुपयांचे पुस्तके घेऊन दिले. व त्यावेळी आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांनी सुद्धा या वाचनालयासाठी बरेच काही सहकार्य केले या सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाचा लाभ मार्कंडा कंन्सोबा येथील तरुणांना झाला. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजीत कोवासे व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या उपस्थितीत मार्कंडा कंन्सोबा येथे पोलिस भरतीत निवड झालेल्यांचा व विविध विभागातील तीन वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून विशाल काळे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी,भारती राऊत, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक मार्कंडा कंन्सोबा, लांडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव अभयारण्य चपराळा, रोखडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा कंन्सोबा, शिंपले, वनविकास वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा कंन्सोबा,व पोलीस भरतीत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वनश्री चापले, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार, सुरेश फरकडे, नानाजी बिटपल्लीवार, देशमुख, दामोदर पोटवार, आत्माराम मस्के, विजय बहिरेवार, दिलीप तिवाडे, आत्माराम मडावी, साईनाथ कुळमेथे, भाऊजी सिडाम, सत्यवान भडके,शंकर मारशेट्टीवार,बिजन मंडल, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक खंडारे,भास्कर फरकडे, विलास हुलके,अजय पोटवार, राजाराम गुंडावार उपस्थित होते.
ॲड विश्वजीत कोवासे, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार व इतरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी मायाबाई बेलकीवार,बयाबाई मडावी,अल्का तोगटीवार,रेखा सातर,सुनंदा लोणारे, निर्मला लोणारे, दत्ताजी कांबळे, गंगाराम आलाम, अमोल कुबडे, अशोक मंडल, विठ्ठल रोहनकर, श्रीनिवास बेलकीवार, व्यंकटेश बेलकीवार, धर्मा पोरटे, रामचंद्र मरचेटीवार,प्रदिप पेंदाम,पत्रू फलके, साईनाथ चौधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक घोडाम, मुरमुरवार शिक्षक, आदि मान्यवर उपस्थित होते
Post a Comment