*युवास्पंदन विद्यालय भिमपूर येथे शालेय गणवेश वाटप*


*युवास्पंदन विद्यालय भिमपूर येथे शालेय गणवेश वाटप*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              युवास्पंदन शैक्षणिक शारीरिक बौद्धिक विकास संस्था कोरची च्या वतीने युवास्पंदन विद्यालय भिमपूर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा टेंभुरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव शालीकराम कराडे होते. 
यावेळी मुख्याध्यापिका सुषमा टेंभुरकर आणि संस्था सचिव शालीकराम कराडे यांनी शालेय जीवनात शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, शिक्षणामुळे आपले आयुष्य कसे सफल होते, ते सांगितले. 
यावेळी शाळेतील निलकमल बिंझलेकर, दिनेश औरासे, शितल टेंभुरकर, नितेश कराडे, सचिन टेंभुरकर, नरेंद्र वालदे, संजोत टेंभुर्णे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments