*तलांडे परिवाराला मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची आर्थिक मदत*
महागाव खुर्द येथील अमोल तलांडे यांचे दुःखद निधन
*दुःखात सहभागी असल्याचे शोकसंदेश!*
*अहेरी:*- महागाव खुर्द येथील मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक गिरमाजी तलांडे यांचे पुत्र अमोल तलांडे यांचे सोमवार 12 आगष्ट रोजी दुःखद निधन झाले. तरुण मुलगा गेल्याचे दुःख तलांडे परिवारावार आल्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी सामाजिक कार्यकर्ते नागेश करमे यांच्यावतीने तलांडे परिवाराला आर्थिक मदत सुपूर्द करून दुःखात सहभागी असल्याचे शोकसंदेश दिले.
अमोलचे माता ललिता व पिता गिरमाजी तलांडे यांच्याकडे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची आर्थिक मदत नागेश करमे यांनी सुपूर्द केले.
यावेळी तुकाराम नैताम, श्रीहरी आलाम, किष्टय्या मेश्राम, तुकाराम गावडे, अनिल मडावी, आनंदराव आलाम, हंसराज आलाम, संजू सिडाम, महेश अर्का, सचिन तलांडे आदी उपस्थित होते.
Post a Comment