अनखोडा येथील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता ,सदर युवकाची माहिती देण्याऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस
आष्टी: दि. २९/०७/२०२४ रोजी नामे चरनदास (हरी, दौलत), दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष हा पाच वर्षा पासुन मंदबुध्दीचा असल्याने त्याचा उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलगा चरनदास यास असे तिघे मिळुन बसने चंद्रपूर येथे पोहचुन मुलगा चरनदास याचे डोक्याचे उपचार करण्यासाठी डॉ. सचिन वेधे यांच्या दवाखान्यात गेले. व मुलागा चरनदास याचेवर डॉक्टरांनी उपचार करून परत जाण्यास सांगीतल्याने, असता आई, वडील, मुलगा गावाकडे अनखोडाला जाण्यासाठी चंद्रपूर येथुन अहेरी बसमध्ये तिघेही येत असतांना एका सिटवर वडील व माझा मुलगा चरनदास व पुढच्या सिटवर आई हि बसुन होती. त्यानंतर वडीलाला बसमध्ये झोप लागल्याने बसमध्ये झोपी गेला आष्टीला बस थांबल्यावर आई, वडील दोघेही आष्टी बसस्थानकला उतरले असता, मुलगा चरनदास हा उतरला नाही तेव्हा आई वडीलांनी बसमध्ये शोध घेतले असता तो मिळुन आला नाही. तो कोठेतरी उतरला असावा सांयकाळी घरी येईल असे समजुन आई वडील आपल्या गावी अनखोडा आले सायंकाळ होवून सुध्दा तो घरी परत न आल्याने, त्याचा गावात व आजुबाजुच्या परीसरात शोध घेतले असता तो कोठेही मिळुन न आल्याने, नातेवाईकांकडे माझ्या मुला बाबत विचारले असता तो तिथे आला नसल्याचे सांगीतले. व आजपावेतो त्याचा शोध घेणे सुरू आहे.
चरनदास दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा.अनखोडा, ता. चामोर्शी जि. गडचिरोली हा मंदबुध्दीचा असल्याने कोनाला काही न सांगता बस मधुन उतरून कोठे तरी गेला आहे. त्याचा आज पावेतो शोध घेवून सुध्दा मिळुन न आल्याने पोस्टेला मुलगा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता ईसमाचे वर्णनः-१) वर्ण- गोरा, २) उंची १६४ सेमी ३) बांधा- मजबुत, ४) केस काळे ५ पेहराव-फिकट पिवळ्या रंगाचा फुलबाहयाचा शर्ट, कथ्या रंगाचा पन्हें ६) भाषा- मराठी असुन सदर युवक कोणालाही दिसून आल्यास दादाजी विठोबा चनकापूरे रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोल्ली मोबाईल क्रमांक ७४९८४३६२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चरनदासच्या वडीलांनी केले आहे व माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीसही देण्यात येईल असे वडीलांनी सांगितले
Post a Comment