*बोरी येथील स्नेहा पुल्लीवारला उपचारासाठी आर्थिक मदत!*
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या तर्फे आर्थिक मदत
*स्नेहा ब्रेन ट्यूमरनी ग्रस्त*
*अहेरी:-* नजीकच्या बोरी येथील इयत्ता तिसरी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी स्नेहा बाबुराव पुल्लीवार हिला ब्रेन ट्यूमर झाल्याने व घरची परिस्थिती हलाखीची असल्याने महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन दुर्गे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना विद्यार्थीनीची आपबित्ती सांगितले. वेळीच ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्नेहाला उपचारासाठी आर्थिक मदत केले.
ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी , स्नेहाला प्राथमिक तपासणी व उपचार केल्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढचे उपचार करू, घाबरण्याचे कोणतेच कारण नाही सर्व व्यवस्थित व सुरळीत होईल असे म्हणत स्नेहाला आत्मविश्वास दिले.
स्नेहा पुल्लीवार शिक्षणात हुशार असून ब्रेन ट्यूमर मुळे चिंताग्रस्त आहे मात्र मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची साथ मिळाल्याने स्नेहाची चिंता दूर झाली असून आरोग्य तंदुरुस्त व सुदृढ होण्यासाठी आता स्नेहाचे आशा पल्लवित झाले आहेत.
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम आर्थिक मदत करताना स्नेहा पुल्लीवार या विद्यार्थीनीसोबत स्नेहाचे काका राहुल पुल्लीवार, चेतन दुर्गे, हनमंतु चेनुरवार, साईनाथ अल्वलवार उपस्थित होते.
Post a Comment