*खा.डॉ.किरसान यांच्या वाढदिवसा निमित्याने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे फळ वाटप व वृक्षारोपण*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
आज दिनांक १४ जुलै रोज रविवार ला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच नवरगाव कोरची मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, सोशल मीडिया प्रमुख वसीम शेख, नगरसेवक धरमसाय नैताम,नगरसेवक धनराज मडावी, नगरसेवक दिलीप मडावी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक हलामी, आसाराम सांडील, कैलास केवास, हमीद पठाण ,खुशाल मोहूर्ले, खेदुराम किऱ्हीबोईर रुख्मन घाटघुमर,कांताराम जमकातन, रवि नंदेश्वर,किशोर कराडे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाढदिवसाचे औचित्य साधुन कोचिणारा जि. प. शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांना नोटबुकचे सुद्धा वाटप करण्यात आले.
Post a Comment