*रामदास मसराम यांच्या कडून नोट बुक वितरण*
.*कोरची :-* येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात कॉंग्रेस नेते रामदास मसराम यांच्या कडून शाळेतील विद्यार्थीना नोट बुक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्द महासभेचे अध्यक्ष रामदास साखरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉंग्रेस नेते रामदास मसराम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परशराम टिकले माजी राष्ट्रीय कॉंग्रेस तालूका अध्यक्ष देसाईगंज ,मनोज भाऊ अग्रवाल राष्ट्रीय कॉंग्रेस तालूका अध्यक्ष कोरची,प्रसिध्दी प्रमुख वशिम शेख, शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे ,नगरसेवक दिलीप मडावी ,महेश नरोटे ,जगन जमकातन ,अरुण मोहुर्ले आदी उपस्थित होते.
विद्यार्थांना शालेय शिक्षण हे नवी दिशा देण्याकरिता खूप आवश्यक बाब आहे. तसेच शालेय शिक्षणासबोत खेळ हे सुध्दा महत्वाचा घटक आहे. यांमुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होतो. असे प्रतिपादन रामदास मसराम यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
कार्यक्रमाचे संचालन जीवन भैसारे यांनी तर आभार सुरज हेमके यांनी मानले. -----------कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Post a Comment