*कोरची येथील आरोग्य मेळाव्यात तब्बल 1048 रुग्णांनी केली आरोग्य तपासणी*


*कोरची येथील आरोग्य मेळाव्यात तब्बल 1048 रुग्णांनी केली आरोग्य तपासणी*

कोरची: ग्रामीण रुग्णालय कोरची येथे काँग्रेसचे नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1048 रुग्णांनी तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे महासचिव हकिमुद्दिन शेख यांनी केले.अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा हर्षलताताई भैसारे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिराचे आयोजक काँग्रेस नेते रामदास मसराम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सदरुद्दिन भामानी, पं.स. वडसाचे माजी सभापती परसराम टिकले,ग्रामीण रुग्णालय कोरचीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ थूल,वैद्यकीय अधिकारी डॉ राऊत, डॉ विटणकर, डॉ बर्डे, वसीम शेख,रामनाथ कोर्चा,नगरसेवक धरमसाय नैताम,महेश नरोटे, नांदळी ग्राम पंचायत चे सरपंच सरील मडावी, माजी सरपंच बाबुराव मडावी, बिहिटेकला ग्रा. पं.चे सरपंच किशोर नरोटे,रवी नंदेश्वर, तुलाराम मडावी,युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक हलामी,चतुर सिंद्राम, रुख्मन घाटघुमर,खुशाल मोहूर्ले आदी उपस्थित होते.यामध्ये कोरची तालुक्याच्या आजू बाजू परिसरातील वास्तव्यात असलेले बहुतांश लोक शेतकरी प्रवर्गातील असुन सुद्धा शेतात मशागतीचे दिवस सुरू असताना या गोरगरिब लोकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर, प्रयत्नशील असलेले शेतकरी आंदोलनाचे नेते रामदास मसराम यांनी कढोली येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप, नेत्र उपचार, मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात 420 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 310 रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली, 65 रुग्णाची बिएमडी मशिन द्वारे तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला. हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून 45 रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच 35 मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन केले व 20 रुग्णाची इसिजी,120 सोनोग्राफी तर 16 रुग्ण मुत्र खड्याचे तर 33 रुग्ण स्त्रीरोग तपासण्यात आले .यावेळी 21 रक्तदात्याणी रक्तदान सुद्धा केले.आरोग्य शिबिराला नागपूरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर व त्यांचे कर्मचारी देसाईगंजच्या ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली. यशस्वीतेसाठी सागर वाढई, स्वप्निल मिसार, जितू चौधरी, उमाकांत दोनाडकर, रेशीम प्रधान, प्रमोद पत्रे, ताजुल उके, विपुल सहारे, मनीष मोटघरे,आकाश पेटकुले, रोशन कवासे, दुषांत वाटगुरे यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments