कुकडेल येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची तालुक्यापासून अंदाजे 6 किमी.अंतरावर असलेल्या
कुकडेल येथे आज दिनांक 5 जून
2024 ला सकाळी 9 वाजता जागतिक पर्यावरण दिवसा निमित्याने आवळा, चिंच, करंजी इत्यादी प्रकारचे झाडे लावताना भारत नुरूटी पोलीस पाटील कुकडेल,मसराम वनरक्षक बेलगाव घाट बिट, सौ.कोडापे मॅडम वनरक्षक लक्ष्मीपूर बिट, राजकुमार नंदेशवर रोजगार सेवक,पाहरसिंग हलामी, क्रिष्णा हलामी,व गावातील महिला पुरुष यांच्या उपस्थितीत झाडे लावण्यात आले यावेळी भारत नुरुटी पोलीस पाटील यांनी झाडाचे महत्व पटवून दिले झाडांपासून सावली मिळते झाडांपासून वातावरण चांगला असते उष्णता कमी असते आज आपल्याकडील जंगल कमी होत असल्यामुळे 45 डिग्री सेल्सिअस तापमान उन्हाळ्यात आहे या आधी इतका तापमान राहत नव्हता याचा कारण म्हणजे जंगल कमी होणे त्यासाठीच झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण चांगला ठेवा असे आपल्या भाषणातून भारत नुरूटी पोलीस पाटील यांनी वेक्त केले.
Post a Comment