*महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचे पुढाकारातून प्रेमियुगल विवाहबद्ध

*
महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचे पुढाकारातून प्रेमियुगल विवाहबद्ध*:

🖋ताहिर शेख 🔸 ०३/०६/२०२४:- कुरखेडा- गेवर्धा:- टंटा मुक्ति समिति गेवर्धा च्या पुढाकाराने विजय सुभाष कामडे मु.चनकापूर ता.सावनेर जि. नागपुर आणि रविना रवींद्र तायवाडे मु.पोटा ता.सावनेर जि. नागपुर यांचे मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जवळपास 3 महिन्यापूर्वी विजय हा राजलक्ष्मी इंटरप्राईजेस कंपनी गेवर्धा या ठिकाणी ड्राइवर म्हणून काम करीत आहे. दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी ग्रा.पं. गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन आज दि. 3/6/2024 ला तंटामुक्त समिती पदाधिकारी व गावकरी यांचे उपस्थितीत दोघांचा विवाह पार पाडण्यात आला.
       तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद,ग्रा.पं. सदस्य कल्पना कांबळे, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, ग्रामकोष अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ती सदस्य सुधीर बाळबुद्धे, योगेश पा.गायकवाड, ताहीर शेख, योगेश नखाते, भुवनेश्वर कांबळे,महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष हिना पठाण, शांतीदेवी पालीवाल, प्राजक्ता कोसरे, कुसुम मस्के,लता डोंगरवार, निराशा वट्टी, शिला बाळबुद्धे, लता सुकारे, अंतकला नखाते,देवाजी पा.शेंडे ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे,मुकेश बोरकर,राहुल नखाते, अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments