कूरखेडा येथील हायवेच्या दोन्ही बाजुने असलेली नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे, चौकशी मागणी
🖋ताहिर शेख 🔸कुरखेडा;२९/०६/२०२४ कुरखेडा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे ५४३ चे काम सध्या प्रगती पथावर आहे. कुरखेड़ा ते गोठनगाव फाटा येथील महामार्ग च्या दोन्ही बाजुने नाली बांधकाम होत आहे पण त्या नालीच्या बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याच मागील दिवसांत पहायला मिळाला, नविनच नाली बांधकामात स्लैब वर मोठ मोठे फटी पडली,त्यांना लपवन्यासाठी वरुण सीमेंट लावून थूक पॉलिश करण्यात आली, तर पंचायत समिति समोर असलेली हायवेची नाली ओलांडताना ट्रकचे चाक त्यात धसून नाली मोडकडिस आली तर आज दी. २९ जून ला नवीन बस स्टैंड समोरिल नालित हाइवेच्याच कामात कार्यरत असलेला टिप्पर मुरुम टाकत असतांना मागील दोन्ही चाक नाली खचल्याने फसल्याची घटना घडली,निकृष्ट होत असलेल्या नाली बांधकामाची अखेर कोण जबाबदारी घेणार? असा आता नागरिक प्रश्न करीत आहेत, महिना पंधरा दिवसात खचत असलेली नाली किती दिवस चालनार? असाही प्रश्न निर्माण होत आहे याच नालीचा उपयोग शहरातून पायी चालणाऱ्या नागरिकांना फुठपाथ म्हणून होणार, तर कोणती नाही नाली केव्हा खचून कुणास जीव गमवावा लागेल अशी भीती निर्माण झाली आहे, या सर्व कामाची चौकशी करुण तात्काळ संभंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे
Post a Comment