सोनसरी येथील महिला पोलीस पाटील वर हल्ला करणार्यांची रवानगी कारागृहात


सोनसरी येथील महिला पोलीस पाटील वर हल्ला करणार्यांची रवानगी कारागृहात

🖋 ताहिर शेख 🔸कूरखेडा - १६/०५/२०२४
      तालूक्यातील सोनसरी येथील महिला पोलीस पाटील याना कर्तव्य बजावत असताना मज्जाव करीत हूज्जत घालत मारहाण करणार्या दोन आरोपीना अटक करण्यात येत न्यायलयाने त्यांची रवानगी तूरंगात केली आहे
          सोनसरी येथील तलावात मागील महिण्यात एका इसमाचा बूडून मृत्यु झाला होता सदर माहिती मिळताच महिला पोलीस पाटील वालदे व कोतवाल फिरोज हलामी घटणास्थळाकडे जात असताना गावातीलच आरोपी दिलीप बाबूराव मडावी वय ४१ व महेश दिलीप मडावी वय २२ या बापलेकानी तिला रस्त्यातच गाठत तू गावातील  माहीती पोलीसाना देते असे मनत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मारहाण केली अशी तक्रार तिने कूरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवि ३५३,३३२,२९४,५०४,३४ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी फरार होते सदर आरोपींचा गोपनीय माहीती आधारे शोध घेत अटक करण्यात येत न्यायालयात हजर करण्यात आले न्यायलयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत चंन्द्रपूर कारागृहात केली आहे सदर कार्यवाही ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा नेतृत्वात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे हवालदार शेखलाल मडावी यानी केली

0/Post a Comment/Comments