*माणूस बणने म्हणजे केवळ पदव्या संपादन करणे नव्हे


*माणूस बणने म्हणजे केवळ पदव्या संपादन करणे नव्हे.

*अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. युवराज मेश्राम यांचे प्रतिपादन*
🖋ताहिर शेख 🔸कुरखेडा- आंधळी :- २९/०४/२०२४:-खऱ्या अर्थाने सम्यक मार्गाने जीवन जगण्यासाठी माणूस बनणे म्हणजे केवळ पदव्या संपादन करणे नव्हे.तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माचे जिवनात आचरण करणे होय. असे प्रतिपादन ब्रम्हपूरी येथील सामाजिक विचारवंत डॉ. युवराज मेश्राम यांनी केले आहे.
     ते तालुक्यातील आंधळी येथे समाजाला दानातून महेंद्रजी जांभुळकर यांनी दिलेल्या तथागत बुद्ध व राजकुमार जनबंधु यांनी दिलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या अनावरणाप्रसंगी प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य संघटक विजय बन्सोड यांनी सुद्धा मुख्य वक्ते म्हणून प्रबोधन केले.
           यावेळी विचारमंचावर , उपसरपंच अप्रव भैसारे, समता सैनिक दलाचे मुख्य कमांडर अरुण कराडे, जिल्हाध्यक्ष अभिमन्यू बन्सोड , कमांडर समर्थ सहारे, पुरुषोत्तम भैसारे, बुद्धिस्ट सोसायटी चे वामन कोटांगले, यशोधरा नंदेश्वर, रोहिणी सहारे, , आदिवासी समाज कार्यकर्ते रमेश मडावी यांनी प्रमुख अतिथी चे स्थान भुषविले.
         नवयुवक पंचशील बौद्ध समाज व समता सैनिक दल यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधन कार्यक्रमानंतर गावातील सर्वांना बौद्ध समाजाच्या वतीने स्नेहभोज देण्यात आले. रात्रो भिम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रबोधन कार्यक्रमाचे संचलन साईनाथ सांगोळे तर प्रास्ताविक मुख्याध्यापक भारत डोंगरे यांनी तर आभार विजेंद्र कराडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्ये उपासक,उपासिका उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments