घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्या ,तालुका सरपंच संघटना आणि अखिल भारतीय सरपंच परिषद यांची मागणी


घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्या
    ,तालुका सरपंच संघटना आणि अखिल भारतीय सरपंच परिषद यांची मागणी

   🖋ताहिर शेख🔸 १३/०३/२०२४:-कुरखेडा तालुक्यात शासनाच्या मोदी आवास घरकुल योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत 1161 घरकुल मंजूर झालेले आहेत. घरकुल बांधकाम मंजूर झाल्यानंतर विहित मुदतीत आणि पावसाळ्यापूर्वी घरकुल बांधकाम व्हावे यासाठी शासनाच्या वतीने 20 हजाराचा पहिला हफ्ता जमा झाल्यानंतर तालुक्यात जवळपास सर्वच लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरु केलेले होते. मात्र तालुक्यात रेतीअभावी सुरु असलेले बांधकाम ठप्प पडत चाललेले आहेत.
        शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास रेती देण्यात येते. पण अजूनपर्यंत मिळणारी 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच नियमितपणे रॉयल्टीद्वारे मिळणारी रेती सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना मिळत नसल्याने तालुक्यातील सुरु झालेले घरकुल बांधकाम ठप्प पडत असल्याने लाभार्थ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
      पावसाळा सुरु होण्यापूर्वी घरकुल बांधकाम पूर्ण होणे आवश्यक असल्याने लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती उपलब्ध करण्यात यावी.3 दिवसात रेतीचा विषय मार्गी न लागल्यास घरकुल लाभार्थ्यासह तालुका सरपंच संघटना आणि अखिल भारतीय सरपंच परिषद यांचे वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मा.तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आलेला आहे.
       निवेदन देताना रोशन सय्यद तालुका अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद कुरखेडा, रेमाजी किरणापुरे उपसरपंच येंगलखेडा, सुषमा मडावी सरपंच गेवर्धा, सविता कुमरे सरपंच चिखली, दिलीप गायकवाड उपसरपंच बेलगाव, गणपत बनसोड माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य जांभुळखेडा उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments