उपविभागीय अधिकारी कार्यालय, कूरखेडा येथील अव्वल कारकुन लाच घेतांना एन्टी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात


उपविभागीय अधिकारी कार्यालय, कूरखेडा येथील अव्वल कारकुन लाच घेतांना एन्टी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात

🖋ताहिर शेख

०६/०२/२०२४ कूरखेडा:- उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथील अव्वल कारकुन श्री नागसेन प्रेमदास वैध्य वय ४६ यांनी १३०००/- हजार रुपयाची लाच नगद रक्कम स्वीकारतांना एन्टी करप्शन ब्यूरो च्या पथकाने दी.०५/०२/२०२४ ला रंगेहाथ पकडले
तकरारदार यास आदिवासी ते आदिवासी जमिन विक्री करण्याकरिता परवानगी आदेश तयार करुण दिल्याचा मोबादला म्हणून आरोपी वैद्य यांनी तक्रारदार यांच्या कड़े मागणी केली त्याला लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत विभाग गड़चिरोलि येथे भेटून तक्रार नोंदविली l पोलिस अधीक्षक श्रीमति अनामिका मिर्झापुरे ला.लू.वी. गड़चिरोलि यांच्या पर्यवेक्षनात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रार गोपनीय ठेवत सहानिशा करित कार्यवाही करिता सापळा कार्यवाहीचे आयोजन केले, आरोपी कारकुन ने तक्रारकर्त्यला १५०००/- रुपायाची मागणी केली असता, तक्रार कर्त्याने १३०००/- रुपये देण्याची सहमति दर्षावित व दोघांत तडजोड झाल्यावर लाचेची उप विभागीय कार्यालय येथील स्वताच्या कक्षात् रक्कम् स्वीकारतान्ना रंगे हाथ मिळून आल्याने आरोपी वैध्य त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन कूरखेडा येथे गुन्हा दाखल आला, त्या नंतर आरोपी नागसेन वैध्य यांच्या निवास स्थान वडसा येथे A.C.B च्या अधिकारी यांनी चमुकडून झड़ती घेण्यात आली,
या सर्व प्रकरनाची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री राहुल माकनिकर. एन्टी करप्शन ब्यूरो नागपुर, श्री सचिन कदम पोलिस अधीक्षक ला. प्र.वि. नागपुर, संजय पुरन्दरे अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपुर यांचे मार्गदर्षणात व पोलिस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगीरीवार, संदीप उडाल, प्रफुल डोरलिकर, लाच लुचपत प्रतिबंध विभाग गड़चिरोलि यांनी केली

0/Post a Comment/Comments