गेवर्धा येथे भव्य प्रोढांचे क्लोज कब्बडी स्पर्धेचे समारोप
दी.१७ ते १९ तारीख तीन दिवसीय होत स्पर्धा*
विलुप्त होत असलेल्या मैदानी खेळाला नवयुवकांनी पुढाकार घेत केल आयोजन
तालुक्यतिल आनी बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या खेड़ाळून्नी दिली भर भरून प्रतिसाद
🖋ताहिर शेख🔸
गेवर्धा:-कोयाराजे क्रिडा मंडळ गेवर्धा यांचे वतीने आयोजित भव्य प्रोढांचे क्लोज कब्बडी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 19/1/2024 ला रात्रौ 1:30 वा. पार पडले. बक्षीस वितरक म्हणुन श्री.चांगदेवभाऊ फाये तालुका अध्यक्ष भाजपा कुरखेडा हे होते.तर अध्यक्षस्थानी सौ.सुषमाताई मडावी सरपंच ग्रा.पं.गेवर्धा हे होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन श्री.रवींद्रजी गोटेफोडे माजी नगराध्यक्ष न.पं. कुरखेडा, डॉ. जगदीशभाऊ बोरकर वैद्यकीय अधिकारी कुरखेडा, निजामभाई शेख, बबलूभाई शेख, रामाजी ताराम उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम पुरस्कार 15001/- रुपयाचा मानकरी रेहाडी संघ जि.गोंदिया, द्वितीय पुरस्कार 10001/- रुपयाचा मानकरी वडेगाव स्टे.संघ जि.गोंदिया, तर तृतीय पुरस्कार 7001/- रुपयाचा मानकरी येडापूर संघ ता.कुरखेडा ठरला.याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ,प्रास्ताविक व आभार ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद यांनी केले.
Post a Comment