भास्कर फरकडे गडचिरोली वार्ता न्यूज
एस. के .पोरवाल महाविद्यालय कामठी येथे सूक्ष्मजीवशास्त्र व जैवरसायनशास्त्र विद्यार्थी संघटनेची स्थापना

एस के पोरवाल महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र व जैवरसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण होते
.या प्रसंगी प्रमुख पाहुणे इंडियन विमेन्स सायंटिस्ट असोसिएशनचे न डॉ. अनुराधा गडकरी निवृत्त वैज्ञानिक सी एस आर आय नेरी नागपूर व डॉ सीमा सोमलवार उपस्थित होत्या.
या उद्घाटन प्रसंगी पॉप्युलर सायन्स, इंडियन विमेन्स सायन्स असोसिएशन नागपूर शाखा द्वारा आयोजित व्याख्यान डॉ अर्चना मुन प्राध्यापिका जैवरसायन शास्त्र आर टी एम नागपूर विद्यापीठ यांनी 'कॉम्बेटिंग मल्टी ड्रग्स रेजिस्ट्रान्स इन युटीआय' या विषयावर व्याख्यान दिले.
वैज्ञानिक क्षेत्रात संशोधकांनी केलेले कार्य समाजापर्यत पोहोचविले पाहिजे,असे आपल्या व्याख्यानातून डॉ अनुराधा गडकरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले.तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हान यांनी महिला जर वैज्ञानिक असली तर समाजावर एक वेगळाच प्रभाव पडतो असे संबोधित करताना म्हटले.या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयात वैज्ञानिक व्याख्यान,कार्यशाळा,सेमीनार्स, वेबिनार व इतर शैक्षणिक कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.वर्षभर चालणाऱ्या या संघटनेत १२ विद्यार्थ्यांचा समावेश असून हे संपुर्ण कार्यक्रम विद्यार्थी राबविणारआहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रेणू तिवारी,डॉ मनीष चक्रवर्ती, डॉ शालिनी चहांदे हेड जैवरसायनशास्त्र,डॉ अलोक रॉय हेड सुक्ष जीवशास्त्र, डॉ ठवरे,डॉ रामटेके,डॉ जाचक, प्रो सूरज कोंबे, डॉ नेहा देशट्टीवर,डॉ. सचिन येरपुडे, निशांत बुरडे,आभा मानापुरे व बी एस सी व एम एस सी चे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा आभा मानापुरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ ठवरे यांनी केले.या कार्यक्रमाला शाम बारापात्रे, शैलेश रामटेके व राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment